Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीUdayanraje Bhosale : ही सामाजिक विकृती आहे; यांच्यावर कठोर कायदा करुन कारवाई...

Udayanraje Bhosale : ही सामाजिक विकृती आहे; यांच्यावर कठोर कायदा करुन कारवाई करा!

जितेंद्र आव्हाडांविरोधात उदयनराजे भोसले भडकले

सातारा : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राम मांसाहारी असल्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक विरोधकांनी त्यांच्यावर टीका केलीच पण स्वतःच्या पक्षाकडूनही त्यांना घरचा आहेर देण्यात आला. भाजपचे आमदार राम कदम यांनी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुका तोंडावर असताना जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत सापडणार आहेत. त्यातच आता उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीसुद्धा आव्हाडांवर टीकास्त्र उपसले आहे.

जलमंदिर येथे अयोध्या येथून आलेल्या प्रभू रामचंद्राच्या अक्षदा कलशाच्या पूजनानंतर उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, ‘‘महापुरुषांवर अशा पद्धतीने वक्तव्य करणे ही एक प्रकारची सामाजिक विकृती आहे. सर्व धर्मांमध्ये संत आणि महापुरुष असून, त्यांनी त्यांच्या धर्माला न्याय देण्याचा आणि वेगळे विचार मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, याच्याशी मला देणे- घेणे नाही. मात्र, ही एकप्रकारची विकृती असून, अशा प्रकारच्या विधानावर राज्य शासन व केंद्र शासनाने कठोर कायदा करून कारवाई केली पाहिजे. हिंदू धर्म हा जगण्याचा मार्ग आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना रुजवली आणि आचरणात आणली. कधीही त्यांनी दुसऱ्या धर्माचा भेदभाव केला नाही. मात्र, असा भेदभाव सध्या राजकारणामध्ये आणून वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न होत आहेत”, अशा तीव्र शब्दांत त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -