
मुंबई: नव्या वर्षात पब्लिक सेक्टरच्या बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. बँकेने आपल्या होम लोनच्या रेटमध्ये १५ बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने एका विधानात म्हटले की होम लोनसाठी प्रोसेसिंग फीही माफ करण्यात आली आहे.
बँकने म्हटले की कमी व्याजदर आणि होम लोनमध्ये प्रोसेसिंग फीमध्ये सूट हा दुहेरी लाभ आपल्या सर्व ग्राहकांना चांगले फायनान्सिंग सॉल्युशन देण्यासाठी तसेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करण्यास कटिबद्ध आहे.
होमलोनवर सर्वात कमी व्याजदर देत असल्याचा दावा
बँकच्या अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार बँक सध्या ८.३५ टक्क्याच्या व्याजदरावर हाऊसिंग लोन ऑफर करत आहे. यासोबतच महिलांना आणि डिफेन्स कर्मचाऱ्यांना ०.०५ टक्के सूट मिळेल. अधिकाधिक अवधी ३० वर्षांपर्यंतच आहे तर सर्वाधिक वय ७५ वर्ष इतके आहे. बँकेचा दावा आहे की ते भारतात होम लोनवर सर्वात कमी व्याज देणारी बँक आहेत.
होम लोन घेताना या ५ गोष्टींची घ्या काळजी
होम लोन घेण्याआधी आपल्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन जरूर करा.
होम लोनसाठी अप्लाय करण्याआधी बँकांच्या लोन फीचर्सची तुलना करावी
होम लोनचा कालावधी कमी राहील याचा प्रयत्न करा.
होम लोन घेताना तुमच्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी लोनचे इंश्युरन्स जरूर केले पाहिजे.
होम लोन घेताना बँक आणि तुमच्यात होणारे अॅग्रीमेंट नीट वाचावे.