Tuesday, May 27, 2025

कोकणमहाराष्ट्रमहत्वाची बातमीरत्नागिरी

Mahad Taliye Landslide : महाडच्या तळीये येथील दरडग्रस्तांना आज मिळणार पक्क्या घरांचा ताबा

Mahad Taliye Landslide : महाडच्या तळीये येथील दरडग्रस्तांना आज मिळणार पक्क्या घरांचा ताबा

मुख्यमंत्री स्वतः करणार घरांचे चावीवाटप


महाड : आजवर नैसर्गिक आपत्तींमळे (Natural Calamity) अनेक दुर्घटना घडल्या. पण या ठिकाणी राजकारण्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. दुर्घटनाग्रस्त लोकांची व्यवस्था झाली आहे की नाही, त्यांची खाण्याची व राहण्याची सोय झाली आहे की नाही याकडे मात्र नंतर लक्ष दिले गेले नाही. मीडियामध्येही नंतर याची फार वाच्यता होत नाही. मात्र, आताचं 'आपलं सरकार' हे प्रसिद्धीसाठी नाही तर लोकांसाठी काम करतं, हे आता स्पष्ट झालं आहे. महाड येथील तळीयेमधील कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्तांच्या (Mahad Taliye Landslide) बाबतीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. दुर्घटना घडून गेल्यानंतर फक्त त्या ठिकाणी जाऊन सहानुभूती न देता त्यांना पक्की घरं बांधून देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे.


कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्त ६६ कुटुंबियांना अखेर आज हक्काच्या पक्क्या घरांचा ताबा मिळणार आहे. माणगाव येथील लोणेरे गावात आज दुपारी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना घरांची चावी देण्यात येणार आहे. त्यानंतर आजच सायंकाळी उर्वरित दरडग्रस्तांना चावी वाटप केले जाणार आहे. त्यामुळे आता ६६ दरडग्रस्तांची अडीच वर्षांपासूनची घराची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.



याआधी कशी करण्यात आली दरडग्रस्तांची व्यवस्था?


कोंढाळकरवाडी येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली. या दुर्घटनेत ६६ घरे गाडली गेली, तर ८७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर बाधित ६६ कुटुंबांपैकी २५ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी कंटेनरमध्ये स्थलांतर करण्यात आले. उर्वरित कुटुंबांनी आपल्या निवाऱ्याची व्यवस्था इतरत्र केली. यानंतर ६६ दरडग्रस्तांसह तळीयेतील धोकादायक परिसरातील १९७ कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार म्हाडाच्या कोकण मंडळाने २६३ घरांचा प्रकल्प हाती घेतला. यातील ६६ दरडग्रस्तांची घरे अखेर आता बांधून पूर्ण झाली आहेत. आता या ६६ घरांचा ताबा आज संबंधितांना देण्यात येणार आहे. अडीच वर्षांनंतर आता २५ कुटुंबे कंटेनरमधून पक्क्या घरात जाणार आहेत.


Comments
Add Comment