मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवल्या जाणाऱ्या २०२४मध्ये टी-२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारतीय संघ स्पर्धेत ग्रुप एमध्ये आहे. ग्रुप एमध्ये भारतासोबत पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड आगे. तर या स्पर्धेतील पहिला सामना यूएसए आणि कॅनडा यांच्यात १ जूनला खेळवला जाणार आहे.
२०२४मध्ये टी-२० विश्वचषकातील एकूण ५५ सामने खेळवले जातील. वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये ९ ठिकाणी विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. यात तीन अमेरिकन शहर न्यूयॉर्क सिटी, डलास आणि मियामी वर्ल्डकप सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे.
२०२४ टी-२० विश्वचषकाचा सेमीफायनल आणि फायनल सामना वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाईल. २६ जूनला पहिला सेमीफायनल सामना गयानामध्ये खेळवला जाईल. २७ जूनला दुसरा सेमीफायनल सामना त्रिनिदादमध्ये होणार आहे. स्पर्धेचा शेवटचा म्हणजेच फायनल सामना २९ जूनला बारबाडोसमध्ये खेळवला जाईल.
२०२४मध्ये टी-२० वर्ल्डकपचा पहिला सामना कॅनडा आणि यूएसएमध्ये १ जूनला खेळवला जाईल. तर विश्वचषकातील फायनल सामना २९ जूनला रंगेल. स्पर्धेत १ ते १८ जून दरम्यान ग्रुप स्टेजचे सामने खेळवले जातील. यानतर १९ ते २४ जूनदरम्यान सुपर ८चे सामने रंगतील.
लीग स्टेजचे सामने – १ ते १८ जून
सुपर ८ मधील सामने – १९ ते २४ जून
सेमीफायनल सामना – २६ आणि २७ जून
फायनल सामना – २९ जून
२०२४मधील वर्ल्डकपचे लीग स्टेजमधील भारताचे सामने
५ जून – भारत वि आयर्लंड
९ जून – भारत वि पाकिस्तान
१२ जून – भारत वि अमेरिका
१५ जून – भारत वि कॅनडा