Monday, July 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवार, उद्धव ठाकरे हेच आव्हाडांचे बोलविते धनी

शरद पवार, उद्धव ठाकरे हेच आव्हाडांचे बोलविते धनी

जितेंद्र आव्हाडांवर कारवाईचे आदेशही निघाल्याची संजय शिरसाटांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) बोलत नाहीत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत नाहीत. त्यांना जातीय दंगली घडवायचा आहेत की काय? असा संशय येतो. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची गरज आहे. गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्याला आहारी जाऊ नका. आडवे येणाऱ्या मांजरांना जनता धडा शिकवेल. श्रीराम मांसाहार करायचे याचे दाखले देणे सुरु आहे. पण यासाठी हीच वेळ का? यांच्यावर कारवाई निश्चित होईल, तसे आदेशही दिले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरात येणार आहेत, त्यांच्याकडे आम्ही देखील कारवाईची मागणी करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले.

राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी १४ वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

“राम मंदिर उद्घाटनानिमित्त काही लोक उगाच भावना भडकवत आहेत. ती वक्तव्य चीड आणणारी आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. हे का करत आहेत आणि तेही राष्ट्रवादीच्या मेळाव्यात. कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये यांना समाजात आपापसांत तेढ निर्माण करायची आहे. तसेच याचा फायदा घ्यायचा आहे,” असेही शिरसाट म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -