Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीUS School firing : नाताळच्या लांबलचक सुटीनंतर पहिल्याच दिवशी शाळेत गोळीबार

US School firing : नाताळच्या लांबलचक सुटीनंतर पहिल्याच दिवशी शाळेत गोळीबार

अमेरिकेतल्या धक्कादायक घटनेत एक विद्यार्थी ठार तर पाच जखमी; तर शूटरने स्वतःवरही झाडली गोळी

वॉशिंग्टन : नववर्ष (New year) सुरु होऊन चार दिवस उलटले तरी जगभरात उत्साह कायम आहे. तसेच काही शाळांच्या लांबलचक सुट्याही सुरु आहेत. अमेरिकेत शाळांना देण्यात आलेल्या सुट्ट्यानंतर काल शाळेचा पहिला दिवस होता. मात्र, या पहिल्याच दिवशी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेच्या आयोवा राज्यातील एका शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या (US School firing) घटनेमुळे अख्खा देश हादरला आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून पाच विद्यार्थी जखमी झाली आहे. गंभीर बाब म्हणजे, शूटरने स्वतःवरही गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

आयोवा येथील पेरी हायस्कूलमध्ये काल गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास (अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ तेथे पोहोचले. तेथे अधिकाऱ्यांना विद्यार्थी आणि शिक्षक लपून बसलेले किंवा ठिकाणाहून पळताना दिसले.

सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी मिच मॉर्टवेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटर १७ वर्षीय असून त्याचे नाव डायलन बटलर असे आहे. तो गोळीबार आणि हँडगनसह मृतावस्थेत आढळून आला. गोळीबार करणाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. गोळीबारात ५ जण जखमी झाले असून त्यापैकी सहावीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पेरी स्कूलच्या प्राचार्यालाही गोळ्या घालण्यात आल्या. जखमींपैकी प्रकृती गंभीर आहे, तर इतर चार जणांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गोळीबार करणाऱ्याच्या पार्श्‍वभूमीबद्दल जे काही आहे तो तपासाचा भाग आहे आणि साहजिकच आम्ही त्याचा सखोल शोध घेणार आहोत. गोळीबाराच्या वेळी संशयिताने सोशल मीडियावर अनेक पोस्टही केल्या होत्या. घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -