मुंबई : काही महिन्यांपासून खासदार संजय राऊत हे वारंवार न्यायालयाचा अवमान करत आहेत. ते न्यायालयाचा कोणताही निर्णय मानत नाहीत. न्यायालयाचा वारंवार अपमान करत राहायचे, याबाबत मी स्वतः न्यायालयाला विनंती करतो की, राऊतांवर सुमोटो कारवाई करून लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली.
पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, काल सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाबद्दल महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या समुहामुळे देशातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे. मेक इन इंडिया हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. या संकल्पपूर्तीला आधार देणारे अदानी सारखे काही महत्त्वाचे उद्योजक आहेत. त्या महत्त्वाच्या उद्योजकांना हिंडनबर्गच्या नावाने आणि पर्यायाने देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. न्यायालयाकडून तो काल हाणून पाडण्यात आला असल्याचे राणे म्हणाले.
न्यायालयाच्या निर्णयाची मिर्ची लागल्याने संजय राऊत यांनी अदानी समूहाबद्दल गरळ ओकली आहे. तसेच आजचा सामनाचा अग्रलेख ही त्यावर आहे. एका बाजूला मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि शरद पवार यांचा चेला आहे, असे संजय राऊत म्हणतात. मग त्यांनी अदानी समूहाबद्दल शरद पवार यांचे काय मत आहे हे समजून घ्यावे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…