Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीJob: खुशखबर! नव्या वर्षात नोकरीच्या वाढणार संधी

Job: खुशखबर! नव्या वर्षात नोकरीच्या वाढणार संधी

नवी दिल्ली: जे लोक नव्या वर्षात २०२४मध्ये नोकरी बदलण्याबाबत अथवा नोकरी शोधण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे. २०२४मध्ये जॉब मार्केटमध्ये हायरिंगबाबत दिसू शकतात. डिसेंबर २०२३मध्ये हायरिंगमध्ये २ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. यानंतर अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की २०२४मध्ये हायरिंगमध्ये ८.३ टक्के वाढ पाहायला मिळू शकते.

रिपोर्टनुसार २०२४मध्ये एकूण हायरिंगमध्ये ८.३ टक्क्यांची उसळी पाहायला मिळू शकते. यात बंगळुरूमध्ये सर्वाधिक ११ टक्के हायरिंग पाहायला मिळेल. रिपोर्टनुसार या वर्षी मॅन्युफॅक्चरिंग , बीएफएसआय, ऑटोमोटिव्ह, रिटेल आणि ट्रॅव्हल टूरिझम सेक्टरमध्ये सर्वाधिक नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

२०२३ हे वर्ष हायरिंग अॅक्टिव्हिटीच्या दृष्टीने चांगले वर्ष नव्हते. २०२३मध्ये हायरिंग अॅक्टिव्हिटी २०२२च्या तुलनेत ५टक्के कमी होते. रिपोर्टनुसार वर्षाच्या अखेरच्या महिन्यात हायरिंग इंडेक्समध्ये २ टक्के उसळी पाहायला मिळाली. यानंतर २०२४मध्ये हायरिंग अॅक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -