Sunday, July 21, 2024
Homeक्रीडाICC Awards: 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर' बनण्याच्या शर्यतीत सामील झाले रवीचंद्रन...

ICC Awards: ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर’ बनण्याच्या शर्यतीत सामील झाले रवीचंद्रन अश्विन

मुंबई: भारताचा स्टार स्पिनर रवीचंद्रन अश्विनला आयसीसीने टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयरसाठी नॉमिनेट केले आहे. अश्विनशिवाय आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड, उस्मान खाजा आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रूटला टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयरसाठी नॉमिनेट केल आहे. २०२३मध्ये चारही खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमध्ये शानदार खेळ केला. यामुळे त्यांना आयसीसीने या अवॉर्डसाठी नॉमिनेट केले आहे. दरम्यान, आता कोणत्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आर. अश्विन

भारतीय स्पिनरला टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर बनण्यासाठी तिसऱ्यांदा नॉमिनेट केले आहे. याआधी अश्विनला २०१६मध्ये टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर बनवण्यात आले होत्. तर २०२१मध्येही आयसीसीच्या या पुरस्कारासाठी नॉमिनेट झाला होता. २०२३मध्ये अश्विनने ७ सामन्यांत ४१ विकेट घेतल्या होत्या. २०२३मध्ये खेळवण्यात आलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विनने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. त्याने ४ सामन्यांत १७.२८च्या सरासरीने २५ बळी मिळवले होते.

ट्रेविड हेड

जून २०२३मध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड भारताविरुद्ध १६३ धावांची शानदार खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले होते. हेडला सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच निवडण्यात आले होते. २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाजाने १२ कसोटी सामने खेळले यात ९१९ धावा केल्या.

उस्मान ख्वाजा

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजासाठी २०२३ हे वर्ष शानदार राहिले. ख्वाजाने २०२३मध्ये एकूण १३ कसोटी सामने खेळले यात १२१० धावा केल्या. याआधी २०२२मध्येही ख्वाजाने कसोटीत शानदार खेळ केला होता. यावेळी ख्वाजाला सलग दुसऱ्यांदा टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयरसाठी नॉमिनेट करण्यात आले.

ज्यो रूट

इंग्ंलंडचा माजी कसोटी कर्णधार ज्यो रूटसाठी २०२३ हे वर्ष खूप चांगले राहिले. इंग्लिश फलंदाजाने २०२३मध्ये ८ कसोटी सामने खेळलेत यात त्याने ७८७ धावा केल्या. या दरम्यान त्याने २ शतके आणि ५ अर्धशतके ठोकली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -