Wednesday, July 24, 2024
HomeदेशMizoram Earthquake : मिझोरममध्ये १० किलोमीटर खोलीवर हादरा बसवणारा भूकंप!

Mizoram Earthquake : मिझोरममध्ये १० किलोमीटर खोलीवर हादरा बसवणारा भूकंप!

सकाळ सकाळी मिझोरम हादरलं

ऐझॉल : मिझोरममध्ये ५ जानेवारी रोजी लुंगलेई येथे सकाळी ७:१८ वाजता ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Mizoram Earthquake) झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) दिली आहे. १० किलोमीटर खोलीवर हा हादरा बसला.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करुन भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश २२.८६ आणि रेखांश ९२.६३ वर दर्शविला. दरम्या, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

फक्त एक दिवस आधी, ४ जानेवारी २०२४ रोजी, १२ वाजून ३८ मिनिटांनी वाजता जम्मू आणि काश्मीरमध्ये ३.९ तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. या आधीच्या भूकंपाची खोली ५ किलोमीटर इतकी कमी होती, त्याचा केंद्रबिंदू अक्षांश ३३.३४ आणि रेखांश ७६.६७ होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -