
आमदार नितेश राणे यांचा घणाघात
कणकवली : काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्ष यांना देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे. त्यासाठीच प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते यात यशस्वी होणार नसल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेसने उबाठा सेना संपविण्याचा घाट घातला असल्याचा हल्लाबोलही आमदार राणे यांनी केला.
नितेश राणे म्हणाले की, अदाणी समूहाबाबत काल सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निकाल दिला. त्यांच्या उद्योगामुळे आपला देश प्रगतीपथावर आहे. असे असताना विरोधक हिंडनबर्ग रिपोर्टच्या नावाखाली देशाची बदनामी करत होते. हा प्रकार सुप्रीम कोर्टाने हाणून पडला आहे. त्यामुळे मिर्ची झोंबल्याने खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी टीका केली. संजय राऊत हे सातत्याने कोर्टाचा अपमान करत आहे. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर चुकीच्या पद्धतीने टीका करून कोर्टाची बदनामी करत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर कोर्टाने सुमोटो कारवाई करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
आमदार जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरणी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, प्रभू श्री राम यांचा अपमान केल्यानंतर तो कुठलाही हिंदू सहन करणार नाही.