
मुंबई: कोरोनाचा(corona) वाढता प्रकोप पाहता महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने(maharashtra covid task force) महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यात म्हटले आहे की पुढील १५ दिवसांपर्यंत लोकांना अधिक लक्ष द्यावे लागेल. टास्क फोर्सने सल्ला दिला आहे की जे रुग्ण ताप, सर्दी आणि खोकल्याने पिडीत आहेत त्यांची कोरोना चाचणी गरजेची आहे. कोविड टास्क फोर्सची बैठक २ जानेवारीला झाली होती. बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कोरोना झाल्यास पाच दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.
जास्त जोखीम असलेल्या रुग्णांना रुग्णालयात भर्ती करण्याचे आदेश
आदेशात म्हटले आहे की होम आयसोलेशनदरम्यान अशा रूममध्ये राहावे लागेल जिथे ताजी हवा येत असेल. दुसऱ्यांदा कोरोना होऊ नये यासाठी मास्क गरजेचा आहे. वरिष्ठ नागरिक तसेच घरात ज्यांना आरोग्याची जास्त जोखीम आहे अशा लोकांनी मास्क जरूर वापरावा असे आदेश देण्यात आले आहेत.
ज्यांना जास्त जोखीम आहे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. टास्क फोर्स लवकरच नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटच्या पृष्ठभूमीमध्ये औषधासंबंधी क्लिनिकल प्रोटोकॉलची घोषणा करणार आहे. सोबतच लोकांना अपील करण्यात आले आहे की ते सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
महाराष्ट्रात कोरोनाचे १४६ नवे रुग्ण
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे नवे १४६ रुग्ण आढळले. तर उपचारानंतर एका दिवसांत १२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोना व्हेरिएंट जेएन१ची एकही केस दाखल झालेली नाही. आतापर्यंत ११० जेएन१ व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळले आहेत. अॅक्टिव्ह केसची संख्या राज्यात ९१४ इतकी आहे. राजधानी मुंबईत कोरोना बाधिक ३१ नवे रुग्ण आढळले. १५ रुग्णांना शहरात उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.