Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीCBSE दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकांमध्ये बदल

CBSE दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकांमध्ये बदल

जाणून घ्या कुठे पाहाल सुधारित वेळापत्रक

मुंबई : नववर्ष सुरु झालं की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना (10 th Borad and 12 th Board Exam) धडकी भरते. कारण बोर्डाच्या परीक्षा अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे व्हावे यासाठी परिक्षेचे वेळापत्रक (Exam Timetable) काही महिने आधीच जाहीर केले जाते. यंदाच्या वर्षीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (Central Board of Secondary Education) दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकांमध्ये छोटे बदल केले आहे. सुधारित वेळापत्रक पाहून त्यानुसार सर्वांनी अभ्यास करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सीबीएसईने (CBSE) जारी केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार, काही विषयांच्या पेपरच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीची तिबेटमधील पेपर परीक्षा आता २३ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात हा पेपर ४ मार्च रोजी घेतला जाणार होता. तसेच, इयत्ता दहावीची रिटेल परीक्षा १६ फेब्रुवारीला होणार होती, ती आता २८ फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता ११ मार्चऐवजी २१ मार्चला होणार आहे.

कधी सुरु होणार परीक्षा?

सुधारीत वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाकडून दोन्ही इयत्तांच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा १३ मार्चला संपणार आहेत, तर बारावीच्या परीक्षा मात्र २ एप्रिलला संपणार आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत घेतल्या जातील.

कुठे पाहाल वेळापत्रक?

जे विद्यार्थी २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसणार आहेत, त्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहता येणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आपलं वेळापत्रक पाहू शकतात. किंवा cbse.nic.in या वेबसाईटवरुनही वेळापत्रक पाहता येऊ शकेल. विद्यार्थी हे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवरुन डाऊनलोडही करू शकतात. वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी

  • सर्वात आधी सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर लॉगइन करा.
  • त्यानंतर होम पेजवर दहावी आणि बारावीच्या सुधारित वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आलेल्या पीडीएफमधील वेळापत्रक आणि सर्व तारखा तपासून पाहा.
  • तुम्ही तुमच्या सोयीसाठी शेड्यूल डाऊनलोड करुन घेऊन शकता, तसेच, प्रिंटही काढू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -