Friday, October 24, 2025
Happy Diwali

Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी! पोलिसांनी चोपले!

Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी! पोलिसांनी चोपले!
अब्दुल सत्तारांनीच सांगितले, लाठीचार्ज करा; गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडं मोडा...

सिल्लोड : वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच स्वतःची आणि सरकारची कोंडी करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हातात आयतं कोलित दिले आहे. मंत्री सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. हा प्रकार पाहून मंत्री सत्तार चांगलेच संतापले. संतापाच्या भरात त्यांनी पोलिसांना लाठीचार्जचे आदेश दिले. कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडं मोडा. एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे, असे शब्द सत्तार यांच्या तोंडून बाहेर पडले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत.

वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तरुणांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मात्र गर्दीतील काही जण गोंधळ घालू लागले. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. तरुणांची हुल्लडबाजी कमी होत नव्हती. त्यामुळे अब्दुल सत्तार स्वतः माईक घेऊन स्टेजवर पोहोचले. तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण, गोंधळ काही शांत झाला नाही. मग सत्तारही चिडले. त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले.

सत्तार एवढ्यावरच थांबले नाहीत तर गोंधळ घालणाऱ्यांना कुत्र्यासारखं मारा, अशा सूचना पोलिसांना देत होते. या लोकांना मारल्यानंतर जेलमध्ये टाका, असेही सत्तार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >