मुंबई: भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने(virat kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने सेंच्युरियन कसोटीत एक अर्धशतक ठोकले होते. तर केपटाऊनमध्ये पहिल्या डावात ४६ धावा केल्या. कोहलीला कसोटी रँकिंगमध्ये फायदा झाला. त्यानंतर अनेक महिन्यांनी टॉप १०मध्ये पुनरागमन केले.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत कोहली ९व्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र वनडे रँकिंगमध्ये शुभमन गिल एक स्थानांनी मागे आहे. टी-२०मध्ये स्पिनर रवी बिश्नोईला फायदा झाला आहे. ऑलराऊंडर्सच्या कसोटी रँकिंगमध्ये रवींद्र जडेजा टॉपवर बनला आहे.
आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये केन विल्यमसन्स अव्वल स्थानावर आहे. तर ज्यो रूट दुसऱ्या स्थानावर आहे. तर स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहे. डेरिल मिशेलला ३ स्थानांनी फायदा झाला आहे. तो चौथ्या स्थानावर आला आहे.
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज ९व्या स्थानावर आहे. त्याला ४ स्थानांचा फायदा झाला आहे. कसोटी फलंदाजी रँकिंगमध्ये कोहलीशिवाय कोणताही फलंदाज टॉप १०मध्ये सामील नाही. कसोटी ऑलराऊंडर्सच्या रँकिंगमध्ये जडेजा अव्वल स्थानावर आहे. रवीचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.