Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीThackeray group : सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Thackeray group : सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

ठाकरे गटाचे अनेक प्रमुख नेते सध्या अडचणीत

निवडणुका लावा अशा बोंबा मारणारा ठाकरे गट ऐन निवडणुकांवेळी तोंडावर आपटणार!

मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना महाविकास आघाडी चांगलीच गोत्यात सापडली आहे. मविआचे अनेक प्रमुख नेते आपल्या आक्षेपार्ह राजकीय वक्तव्यांमुळे तसेच केलेल्या घोटाळ्यांमुळे अडचणीत सापडत आहेत. काल जितेंद्र आव्हाड यांनी रामाला मांसाहारी म्हटल्यामुळे वाद पेटला आहे. ही मविआच्या पराभवाची लक्षणे आहेत. त्यातच आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) देखील अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुषमा अंधारे यांच्यावर अमन परदेशी (Aman Pardeshi) यांनी मालेगाव (Malegaon) तालुक्यात गुन्हा दाखल केला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे यांच्या विरोधात भादवि कलम २९५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अंधारेंसह ठाकरे गट चिंतेत सापडला आहे.

सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्मियांची पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी वादग्रस्त शब्दप्रयोग केला होता. या शब्दप्रयोगामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप अमन परदेशी यांनी केला.

याआधीही ललित पाटील प्रकरणात झाला होता अंधारे-परदेशी वाद

याआधी शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात भाषण करताना सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासोबत नाशिकच्या अमन परदेशी यांचे नाव घेतले होते. तेव्हा परदेशींनी अंधारे यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता. त्यामुळेही अंधारे अडचणीत सापडल्या होत्या.

निवडणुकांच्या वेळी ठाकरे गट गोत्यात

वर्षभर निवडणुका लावा अशा बोंबा मारणारा ठाकरे गट निवडणुका जवळ आलेल्या असताना मात्र तोंडावर आपटत आहे. संजय राऊत (Sanjay Raut), किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) अशा ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांचे कोविडमधील घोटाळे बाहेर आल्याने ते गोत्यात आले आहेत. शिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) मुलगा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दिशा सालियन हत्या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. मालेगाव येथील नेते शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay hiray) हे सध्या जेलमध्ये आहेत. तर गिरणा कारखान्याशी संबंधित १७८ कोटींच्या शेअर्स घोटाळ्याचा दादा भुसेंचं नाव घेतल्याप्रकरणी त्यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा दावा केला आहे. आता सुषमा अंधारे यांच्यावरही मालेगावमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -