Wednesday, August 6, 2025

Jitendra Awhad : आव्हाडांना संत समाज माफ करणार नाही, तो समोर आला तर त्याचा वध करेन

Jitendra Awhad : आव्हाडांना संत समाज माफ करणार नाही, तो समोर आला तर त्याचा वध करेन

अयोध्येतील परमहंस आचार्य महाराजांनी दिले खुले आव्हान


अयोध्या : शरद पवार गटातील नेते, मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भगवान श्री राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राम आमचा आणि तो बहुजन आहे. तसेच राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. ते शिकार करून खायचे, असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्याबाबत आता भाजप आणि अजित पवार गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आव्हाडांच्या विरोधात निदर्शने केली.


दरम्यान, अयोध्येतील परमहंस आचार्य महाराज आव्हाड यांच्या वक्तव्यावर आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांना संत समाज माफ करणार नाही. तो समोर आला तर त्याचा वध करणार, असा इशारा परमहंस आचार्य महाराज यांनी दिला आहे.


परमहंस आचार्य महाराज म्हणाले, "जितेंद्र आव्हाड याच्यावर कडक कारवाई झाली नाही तर मी स्वत: त्या व्यक्तीचा वध करणार आहे. २४ तासात त्याच्यावर कारावई करावी, हा माझा केंद्र आणि राज्य सरकारला इशारा आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा कोणीही अपमान केला तर त्याला जीवंत सोडले जाणार नाही."

Comments
Add Comment