
नोंदणी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक इरा खान (Ira Khan) हिच्या लग्नाची चर्चा आहे. तिचं केळवण, नेसलेली नऊवारी साडी ते तिने मराठीत घेतलेला उखाणा इथपर्यंत सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या. त्यामुळे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काल इरा खान मराठमोळ्या नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) विवाहबंधनात अडकली. नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी इराने सुंदर धोती चोली ड्रेस परिधान केला होता, तर नुपूर मात्र शॉर्टस् आणि सॅण्डो (Shorts and Sando) घालून बसला होता. याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
लग्नापूर्वी नुपूर शिखरे शॉर्टस् आणि सॅण्डो घालून मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसला. घरातून धावत तो लग्नस्थळी पोहोचला. नंतर त्याने ढोल वाजवत मनसोक्त डान्स केला. पाहुण्यांच्या आणि कुटुंबियांच्या गर्दीत तो डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. इरा - नुपूरच्या या अनोख्या वरातीची जोरदार चर्चा होत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
लग्नात इराची आई रीना यांनी छानसा ड्रेस घातला होता, तर आमिरने लेकीच्या लग्नासाठी ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता व धोती निवडली होती. किरण राव सोनेरी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. तर, नुपूर शिखरेच्या आई प्रीतम शिखरे यांनी लाल रंगाची साडी नेसली होती. नुपूर व इराच्या लग्नाला मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी देखील हजेरी लावली. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही लवकरच होणार आहे. या रिसेप्शन सोहळ्याला अनेक बॉलीवूडकर हजेरी लावणार आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram