
केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस चढ-उताराचा ठरला. पहिल्या दिवशी अनेक मोठे रेकॉर्ड्स बनले. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या आफ्रिकेचा संघ केवळ ५५ धावांवर बाद झाला. हा भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दक्षिण आफ्रिकेचा सर्वात कमी स्कोर आहे. या शिवाय आजच्या दिवसांत रेकॉर्डब्रेक २३ फलंदाज बाद झाले.
शेवटचे ६ फलंदाज भोपळा न फोडता परतले
या सामन्यातील पहिल्या डावात भारताचे ६ फलंदाज कोणतीही धाव न करता बाद झाले. भारतीय संघाटा पाचवा फलंदाज तेव्हा बाद झाला जेव्हा भारताची धावसंख्या १५३ होती. यानंतर एकाही फलंदाजाला एकही धाव करता आली होती. असे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा घडले जेव्हा एका डावात ७ फलंदाज आपले खाते खोलू शकले नाहीत.
१२१ वर्षांआधीचा रेकॉर्ड तुटता तुटला राहिला
केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी २३ फलंदाज बाद झाले हा एक रेकॉर्ड आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक विकेट पडण्याचा रेकॉर्ड १२१ वर्षांआधी बनला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक २५ फलंदाज बाद झाले होते. दोन्ही संघादरम्यान हा कसोटी सामना १९०२ मध्ये खेळवण्यात आला होता.