
मुंबई: लांब, घनदाट आणि सुंदर केसांसाठी तेलाने मालिश करणे गरजेचे असते. वाढत्या प्रदूषणामुळे केसांची हानी होते. केस रूक्ष, निस्तेज बनतात. तसेच ते तुटतातही. केसांमध्ये पोषणासाठी तेल लावणे गरजेचे असते. जाणून घ्या कोणते तेल लावणे केसांसाठी अतिशय फायदेशीर असते.
खरंतर, केसांमध्ये मोहरीचे तेल आणि नारळाचे तेल दोन्ही लावू शकतो. नारळाच्या तेलात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन डी मिळते.
यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते.
मोहरीच्या तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते.
हे तेल निस्तेज केस, अकाली पांढरे होणे आणि फाटे फुटणाऱ्या केसांपासून दिलासा मिळतो.
नारळाच्या तेलाला सुगंध असतो तर मोहरीच्या तेलात हलका सुगंध असतो.