Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीFace pack: ग्लोईंग स्किन हवीये तर नाचणी फेसपॅकचा करा वापर

Face pack: ग्लोईंग स्किन हवीये तर नाचणी फेसपॅकचा करा वापर

मुंबई: सुंदर आणि डागविरहित त्वचा कोणाला आवडत नाही. खासकरून महिला स्किन ग्लोईंग करण्यासाठी अनेक गोष्टी ट्राय करतात. चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी दर महिन्याला हजारो रूपये खर्च करतात. अनेकदा फेशियलमुळेही चांगला रिझल्ट येत नाही. त्वचेवर चमक आणण्यासाठी आणि त्वचेचा निखार वाढवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे नाचणीचा फेसपॅक. नाचणी खाण्यासाठी जितकी फायदेशीर असते त्यापेक्षा अधिक चेहऱ्यावरील याचा वापर ग्लो करण्यासाठी केला जातो.

नाचणी म्हणजेच फिंगर मिलेट दक्षिण भारतातील प्रसिद्ध धान्य आहे. गहू, तांदूळ यानंतर सर्वाधिक पिकवले जाणारे धान्य म्हणजे नाचणी. नाचणीमध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आर्यन, व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स. याशिवाय नाचणीमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणही असतात जे शरीराल फ्री रेडिकल्सपासून वाचवतात. स्किनकेअरमध्येही नाचणीचा वापर केला जातो. नाचणीमधील अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटामिन ई त्वचा हेल्दी ठेवण्याचे काम करतात. यामुळे त्वचेचा रक्तसंचार वाढतो.

कसा तयार करावा नाचणीचा फेस पॅक

नाचणीचा फेस पॅक बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी सगळ्यात आधी नाचणीचे पीठ – १ चमचा, दही अर्धा चमचा, मध अर्धा चमचा, लिंबाचा रस १ चमचा. सगळ्यात आधी एका वाटीत नाचणीचे पीठ, दही आणि मध घ्या. ते चांगले मिसळा. यात लिंबाचा रस मिसळा. सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा.

कसा कराल वापर

नाचणीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे सुकू द्या. त्यानंतर थंड पाणी अथवा कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून २-३ वेळा नाचणीचा फेस पॅक लावल्याने त्वचेमध्ये रंगत येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -