Saturday, July 5, 2025

Nitesh Rane : घाणेरड्या बातम्या आणि अफवा पसरवण्याचा 'यांचा' धंदा

Nitesh Rane : घाणेरड्या बातम्या आणि अफवा पसरवण्याचा 'यांचा' धंदा

संजय राऊत, आदित्य आणि उद्धव ठाकरे हे दहा जनपथचे पगारी हुजरे


भाजप आमदार नितेश राणे यांनी फटकारले!


मुंबई : दहा जनपथचे अधिकृत पगारी नोकर आणि त्यांचे झालेले हुजरे आणि गुलाम संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आणि त्याचा मालक यांनी राज्य सरकारला, महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांना दिल्लीच्या ताटाखालचं झालेलं मांजर म्हणणं, म्हणजे हा २०२४ चा फार मोठा जोकच झाला आहे, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खिल्ली उडवली. तसेच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला नेले असे आरोप करत सरकारवर टीका करणार्‍या संजय राऊतांना नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले.


नितेश राणे म्हणाले, सकाळी चहा प्यायचा की कॉफी प्यायची हे दिल्ली आणि दहा जनपथच्या आदेशाशिवाय जे ठरवत नाहीत, त्यांनी दुसर्‍यांवर बोट ठेवायचं ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आज सकाळच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आपल्या न्याययात्रा आणि इतर गोष्टींमध्ये व्यस्त आहेत, म्हणून उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी फोनाफोनी करतायत. त्यांनी नितीशकुमारांना फोन केला आणि अन्य लोकांची ते जुळवाजुळव करतायत. म्हणजे आता दहा जनपथमध्ये दोन नवीन कारकून नेमलेले आहेत, असं दिसतंय, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.


पुढे ते म्हणाले, चाटण्याचा उच्चांक काय असतो, हे कोणाला अनुभवायचं असेल तर आजचा सामनाचा अग्रलेख पाहायचा. ज्या काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक क्षणाला राम मंदिराचा विरोध केला, ज्यांनी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांना राम मंदिराचं श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखं आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या चायनीज मॉडेल हिंदूंची या हिंदू धर्माला गरज नाही. यापेक्षा अधिकृत त्या काँग्रेसच्या सेवा दलची टोपी घाला आणि राहुल गांधी आणि त्या सोनिया गांधीसमोर सलाम ठोकायला उभे राहा, असा सल्ला नितेश राणे यांनी राऊतांना दिला.


नितेश राणे म्हणाले, संजय राऊतने त्याच्या पगारापुरतं आणि लायकीपुरतंच बोललं पाहिजे. कारण काही दिवसांअगोदर काँग्रेसने उद्धव ठाकरेला फोन करुन तुझ्याबाबत जी तंबी दिली त्यामुळे हातभर फाटल्याने आजचा काँग्रेसवरचा अग्रलेख सामनामध्ये लिहिला आहे. ज्यात राम मंदिराच्या निर्माणाचं श्रेय काँग्रेसला दिलं आहे.



कोणतेही प्रकल्प गुजरातला गेले नाही...


प्रकल्प गुजरातला जातायत आणि हे सगळे तोंडावर कुलूप लावून बसले आहेत, हे कसले राज्यकर्ते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले, महानंद डेअरी प्रकल्प मोठ्या राजकारण्यांनी पुन्हा एकदा गुजरातला पळवला, हे घाणेरड्या बातम्या आणि अफवा पसरवण्याचं काम तो बेबी पेंग्विन असो किंवा संजय राऊत असो, यांचा धंदाच झालेला आहे. ना तो पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला गेलाय आणि ना महानंदच्या बाबतीत अशी काही चर्चा आहे.


तुम्हाला अदानी समूह चालत नाही पण तुझ्या मालकाला आणि आदित्य ठाकरेला रोमिन छेडा, कुलदेव पारेख, राहुल गोम्स, नंदकिशोर चतुर्वेदी चालतो, हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी हे सगळे अमराठी लोक तुम्हाला चालतात. ते काय लालबागच्या मराठी माणसाच्या नावाने केलं होतं का? मग तेव्हा तुझ्या मालकाच्या मुलाला तोंडावर कुलूप लावलेला की बाकी कुठे लावलेला याचं उत्तर दे. संध्याकाळी साडेसातचा ग्लास पुसण्यासाठी तुम्हाला गुजराती समाजावर काही हरकत नाही. मग आता सकाळी उठून तुम्हाला गुजरातवर आक्षेप घेण्याचा काय अधिकार आहे?


म्हणून उगाच आमच्या सरकारवर टीका करु नका. महानंदा असो किंवा महालक्ष्मी रेसकोर्स असो, विकासाची जबाबदारी आता महायुती सरकारची आहे. वर्षानुवर्षे उद्धव ठाकरे आणि त्याचे कुटुंबिय मुंबईचा जो विकास करु शकले नाहीत, तो आमचा महायुतीचं सरकार करुन दाखवेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment