Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

PAP Scam : तब्बल २०,००० कोटींच्या पीएपी घोटाळ्यात शरद पवारांचे कुटुंबिय

PAP Scam : तब्बल २०,००० कोटींच्या पीएपी घोटाळ्यात शरद पवारांचे कुटुंबिय

सोमय्यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चौकशीची मागणी


मुंबई : वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेचा घोटाळा अर्थात पीएपी घोटाळ्याचा (PAP Scam) लाभ शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील मिळाला आहे, असा आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.


हा घोटाळा २० हजार कोटींचा आहे. ज्यामध्ये शाहिद बलवा आणि पवार यांचे निकटवर्ती चोरडिया यांना लाभ मिळाला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. यामध्ये १९०३ सदनिका बांधल्या जात आहेत. त्यासाठी वेगवेगळी आरक्षण हटवली जात असल्याचे देखील सोमय्या म्हटले. भांडूप येथील १९०३ सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरचा पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. ला देण्यात आला. न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने यासाठी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनी सोबत करार केला आहे. ही जागा प्रताप पवार यांच्या निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीची आहे.



त्याचबरोबर या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहे. १९०३ सदनिका महापालिका बाजारभावाने रु. ५८ लाखात एक सदनिका प्रमाणे घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठी जमीन व बांधकामाचा खर्च म्हणून १५ ते १७ लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये ४० लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे.


प्रताप पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे शेअर कॅपिटल फक्त रुपये १ लाख आहे. परंतु या कंपनीत २०२१ मध्ये १९ मार्च २०२१ रोजी सिरम इन्स्टिट्युटने रुपये ४३५ कोटी ६ टक्के व्याज या दराने वीस वर्षासाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत. या कंपनीने कोविड लस बनवले होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.


१ लाखाचे शेअर कॅपिटल प्रताप पवार व त्यांच्या पत्नीची त्याच्यासमोर रुपये ४३५ कोटीचे गुंतवणूक ६ टक्के दराने सिरम इन्स्टिट्युट यांनी केली आहे. रुपये १०० कोटीच्या गुंतवणुकीच्या समोर रुपये १००० कोटीचा भांडूप पीएपी घोटाळ्याचा फायदा/लूट चोरडिया यांचे न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला करण्यात निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. ही कंपनीही सहभागी झाली आहे. त्यामुळे या पीएपी घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Comments
Add Comment