Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीHealth: महिलांसाठी एखाद्या टॉनिकपेक्षा कमी नाहीये अ‍ॅपल सिडार व्हिनेगार

Health: महिलांसाठी एखाद्या टॉनिकपेक्षा कमी नाहीये अ‍ॅपल सिडार व्हिनेगार

मुंबई: अ‍ॅपल सिडार व्हिनेगार हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अ‍ॅपल सिडार व्हिनेगारच्या एका चमच्याने महिलांच्या अनेक समस्या दूर होतात. वेट लॉसपासून ते याचा वापर अनेक आजारांमध्ये केला जातो. हृदयासारख्या भयंकर आजारांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे. अ‍ॅपल सिडार व्हिनेगारचा वापर तुम्ही सरळ करू शकत नाही एखाद्या गोष्टीसोबत याचा वापर केला जाऊ शकतो. त्वचेला चमक आणणे, केसांमधून कोंडा घालवणे याशिवाय लठ्ठपणा दूर करण्यास अ‍ॅपल सिडार व्हिनेगारचा वापर होतो.

वजन कमी करण्यात फायदेशीर

आजकाल लठ्ठपणा ही सामान्य समस्या बनत चालली आहे. अ‍ॅपल सिडार व्हिनेगार या समस्येपासून सुटका मिळवण्याचा एक नैसर्गिक आणि फायदेशीर उपाय आहे. यातील अ‍ॅसिडिक गुण वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात. पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच भूक कमी करून ओव्हरइंटिंगपासून वाचवतात.सोबतच मेटाबॉलिज्म वाढवून वजन घटवण्यात फायदेशीर ठरतात.

पचनासाठी फायदेशीर

आजकालच्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अनेकांना पचनासंबंधित आजार सतावतात. बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, गॅससारख्या समस्या सतावतात. अ‍ॅपल सिडार व्हिनेगारमधील पेक्टिन आणि अ‍ॅसिड पाचन शक्ती वाढवतात. यामुळे पोट साफ राखण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर

अ‍ॅपल सिडार व्हिनेगारमध्ये एल्फा हायड्रोक्सी अ‍ॅसिड असते हे चेहऱ्यावर लावल्याने चेहरा स्वच्छ आणि चमकदार बनतो. त्वचेवरील डेड स्किन हटवून नवी त्वचा आणतात. अ‍ॅपल सिडार व्हिनेगार चेहऱ्यावर लावल्याने हळूहळू डाग दूर होतात तसेच त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.

हृदयरोगासाठी अतिशय फायदेशीर

अ‍ॅपल सिडार व्हिनेगारमधील फायबर हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण हे हृदयवाहिनीच्या रोगांचा धोका कमी करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -