मुंबई: गेल्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर दिसला नाही. मात्र आता भारतीय संघासाठी चांगली खबर आहे. खरंतर, हार्दिक पांड्या लवकरच मैदानावर पुनरागमन करू शकतो. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. यात व्हायरल फोटोमध्ये हार्दिक पांड्या ट्रेनिंग घेताना दिसत आहे.
विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता हार्दिक पांड्या
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. आफ्रिका दौऱ्यात हार्दिक पांड्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र भारत-अफगाणिस्तान मालिकेत हार्दिक पांड्या पुनरागमन करणार का? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघादरम्यानचा मालिकेतील पहिला टी-२० सामना ११ जानेवारीला खेळवला जाईल. मात्र हार्दिक पांड्या भारत-अफगाणिस्तान मालिकेत खेळू शकणार नाही. असे मानले जात आहे की हार्दिक पांड्या लवकरच पुनरागमन करू शकतो.
Hardik Pandya has started training session.
– He is getting ready to strong comeback…!!!! pic.twitter.com/cZ4mBF440Y
— CricketMAN2 (@ImTanujSingh) January 2, 2024
पुन्हा मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसणार हार्दिक पांड्या
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा भाग बनला होता. खरंतर, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवरून हार्दिक पांड्याला ट्रेड केले होते. या पद्धतीने आयपीएल २०२४च्या हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. सोबतच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या याआधी मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे. आयपीएल २०१५मध्ये हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये खेळला होता. यानंतर हार्दिक पांड्या आयपीएल २०२१पर्यंत मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे