David Warner : डेव्हिड वॉर्नरची बॅग चोरीला; भावनिक व्हिडीओ शेअर करत बॅग परत करणार्‍याला दिली ऑफर...

म्हणाला, माझ्यासाठी त्या वस्तू खूप मौल्यवान होत्या...


सिडनी : क्रिकेटविश्वात सध्या कसोटी सामन्यांची (Test series) चर्चा आहे. यात आज ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) सिडनीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एका गोष्टीमुळे तो चिंतीत झाला आहे. त्याच्यासाठी मौल्यवान असलेल्या वस्तू असणारी त्याची बॅग चोरीला गेली आहे. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ शेअर करत त्याने ही बातमी दिली आहे.


डेव्हिड वॉर्नरने या व्हिडीओमध्ये चोरीला गेलेली बॅग त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. ती परत करणार्‍याला कोणतीही शिक्षा किंवा दंड न देता डेव्हिडने एक ऑफर दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना वॉर्नरने लिहिले की, "दुर्दैवाने, हा माझा शेवटचा पर्याय आहे. कोणीतरी सामानातून माझी बॅग काढली आहे, ज्यामध्ये माझी टोपी आणि माझ्या मुलांसाठी भेटवस्तू होत्या. हे माझ्यासाठी भावनिक आहे, मला या वस्तू परत मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे.


वॉर्नरने पुढे लिहिले की, जर तुम्हाला खरोखर बॅग हवी असेल तर, माझ्याकडे अजून एक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही ती परत केलीत तर मी तुम्हाला काही करणार नाही. जर माझ्या बॅगेतलं सामान तुम्ही परत केलंत तर मी आनंदाने बॅग तुम्हाला देईन. त्या बॅगमध्ये दोन बॅगी ग्रीन कॅप्स आहेत, मला ही बॅग परत मिळेल याची आशा आहे'. डेव्हिडच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी ऐकून वाईट वाटलं, तुला लवकरात लवकर बॅग मिळू देत, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.





Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त