Sunday, August 10, 2025

Nitesh Rane : भांडुपच्या सोम्यागोम्याला थोबाड बंद करण्याची दहा जनपथची तंबी!

Nitesh Rane : भांडुपच्या सोम्यागोम्याला थोबाड बंद करण्याची दहा जनपथची तंबी!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांना सणसणीत टोला


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात 'सोम्यागोम्या' या शब्दावरुन वार पलटवार सुरु होते. अजित पवारांनी संजय राऊत यांचा सोम्यागोम्या असा उल्लेख केल्यानंतर सोम्यागोम्या कोण हे २०२४ च्या निवडणुकीत कळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. यावर आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना चांगलंच खडसावलं आहे.


नितेश राणे म्हणाले, भांडुपमध्ये बसून सोम्यागोम्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलू नये. तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खडसावलं आहे, याची बातमी आमच्याकडे आहे. उद्धवजींना दहा जनपथवरुन कडक आदेश आले आहेत, की संजय राजाराम राऊतचं थोबाड बंद करा. अशी तंबी मिळाल्यानंतर एरंडेल प्यायल्यासारखा त्याचा चेहरा झाला आहे. म्हणून जागावाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी इज्जत ठेवायची असेल तर सकाळचं थोबाड बंद कर आणि घरी बस, असं नितेश राणे यांनी राऊतांना ठणकावलं.






 










View this post on Instagram























 

A post shared by PrahaarNews Live (@prahaarnewslive)





काशीबाबत वक्तव्य करणार्‍या संजय राऊतांचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, सामनामध्ये काशी कलंकीत झाली आहे याबद्दल अग्रलेख लिहिला आहे, असं संजय राऊत म्हणतो. पण काशी कलंकीत खर्‍या अर्थाने कधी झाली तर काही आठवड्यांअगोदर तुझ्या मालकाचा मुलगा आपल्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी काशीत गेला तेव्हा काशीमध्ये गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती. त्यामुळे काशीला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचारांचं केंद्र आणि राज्य सरकार निश्तिच पद्धतीने करेल. फक्त तुझ्या मालकाचा मुलगा काशीमध्ये येऊन आपलं पाप धुण्याचा जो प्रयत्न करतो त्याबद्दलही अग्रलेख लिहिलास तर बरं होईल, असं नितेश राणे म्हणाले.






 










View this post on Instagram























 

A post shared by PrahaarNews Live (@prahaarnewslive)




Comments
Add Comment