Thursday, July 10, 2025

मणिपूरमध्ये ४ जणांची गोळी घालून हत्या, अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू

मणिपूरमध्ये ४ जणांची गोळी घालून हत्या, अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू

इंफाळ: मणिपूरमध्ये(manipur) नव्या वर्षाच्या संध्याकाळी हिंसाचाराची घटना घडली. सोमवारी थौबल जिल्ह्यात ४ जणांची गोळी घालून हत्या करण्यात आली आणि इतर जखमी झाले. यानंतर राज्यातील पाच घाटी जिल्ह्यांमध्ये पुन्हा कर्फ्यू लावण्यात आला.


मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्लेखोर बंदूकधाऱ्यांची ओळख पटलेली नाही. हे हल्लेखोर लिलोंग चिंगजाओ क्षेत्रात पोहोचले आणि तेथील स्थानिक लोकांना त्यांनी आपले निशाण बनवले. यात त्यांनी केलेल्या गोळीबारात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.



मणिपूरमधील या ५ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू


हल्ल्यानंतर चिडलेल्या जमावाने तीन चारचाकी गाड्यांना आग लावली नाही. मात्र या कार कोणाच्या होत्या हे स्पष्ट झालेले नाही. या हिंसाचारानंतर थौबल, इन्फाळ पूर्व, इन्फाळ पश्चिम, काकचिंग आणि विष्णूपूर जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लावण्यात आला.



३ मेपासून आतापर्यंत १८०हून अधिक जणांचा मृत्यू


३ मे २०२३ला मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार भडकल्यानंतर आतापर्यंत १८०हून अधिक लोक मारले गेले. यात १००हून अधिक जखमी झालेत. ३ मेला जेव्हा डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकजुटता मोर्चा आयोजित करण्यात आला होता तेव्हा हिंसाचार उसळला होता.

Comments
Add Comment