Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीस्वस्तात मिळत आहे २०० MP कॅमेरावाला हा फोन, २० मिनिटांत होतो फुल्ल...

स्वस्तात मिळत आहे २०० MP कॅमेरावाला हा फोन, २० मिनिटांत होतो फुल्ल चार्ज

मुंबई: नव्या वर्षात जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लान बनवत आहात ज्यात २०० एमपी कॅमेरा, फास्ट चार्जर आणि अनेक दमदार फीचर्स असतील. तर आज आम्ही तुम्हाला एका स्पेशल डील्सबद्दल सांगणार आहोत.

Redmiच्या या फोनवर डील

Redmi Note 12 pro plus 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या हँडसेटमध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर आणि दमदार कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

मिळणार हे खास फीचर

रेडमीच्या या फोनमध्ये २०० एमपी कॅमेरा, 120wचा फास्ट चार्जर, 3D Arc डिझाईन आणि अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतील. स्पेसिफिकेशनबाबत अधिक जाणून घेण्याआधी यावर मिळणाऱ्या डील्सबाबत जाणून घेऊया.

काय आहे डील?

Redmi Note 12 pro plus 5Gवर अनेक बँका ३००० रूपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट देत आहेत. यात अनेक मोठ्या बँकांच्या नावांचा समावेश आहे.

किती होईल किंमत

रेडमीचा हा फोन २७,९९९ रूपयांना लिस्टेड आहे. या किंमतीत ८ जीबी + २.५६ जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. ३००० रूपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटनंतर याची किंमत २४,९९९ रूपयांपर्यंत होऊ शकते.

कसा आहे कॅमेरा सेटअप

Redmi Note 12 pro plus 5Gमध्ये ट्रिपल रेयर कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेरा २०० MP कॅमेरा आहे. कंपनीचा दावा आहे ही हा अल्ट्रा हाय रेझोल्यूशन कॅमेरा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -