Wednesday, June 18, 2025

IND vs SA:दुसऱ्या कसोटीत मोठी खेळी करण्यासाठी तयार विराट कोहली, सरावात गाळला घाम

IND vs SA:दुसऱ्या कसोटीत मोठी खेळी करण्यासाठी तयार विराट कोहली, सरावात गाळला घाम

मुंबई: विराट कोहली(virat kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतकापासून दूर राहिला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला गेला होता. यात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली होती. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. आता दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी किंग कोहलीने घाम गाळण्यास सुरूवात केली आहे.


सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे यात कोहली नेट्समध्ये बॅटिंगचा सराव करत चांगलाच घाम गाळत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला कोहली मैदानात जाताना दिसतोय. या दरम्यान तो काळ्या चश्मामध्ये आहे. त्यानंतर कोहलीने स्ट्रेचिंग केली. यानंतर कोहली नेट्समध्ये बॅटिंग करताना दिसला.


 


पहिल्या कसोटीत शतकाच्या जवळ गेला होता कोहली


विराट कोहली पहिल्या कसोटीत शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर बाद झाला होता. कोहलीने ८२ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७६ धावा केल्या होत्या. या खेळी दरम्यान कोणत्याही फलंदाजाची त्याला साथ मिळाली नाही. भारताच्या दुसऱ्या डावात कोहलीशिवाय केवळ गिलला दोन अंकी संख्या गाठता आली होती. त्याने २६ धावा केल्या होत्या. याशिवाय सर्व फलंदाज एकेरी धावा करून बाद झाले होते.



आतापर्यंत असे राहिले कसोटी करिअर


कोहलीने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये ११२ कसोटी सामने खेळले आहेत. यातील १८९ डावांत त्याने ४९.३८च्या सरासरीने ८७९० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २९ शतके आणि २९ अर्धशतके ठोकली.

Comments
Add Comment