मुंबई: निरोगी राहण्यासाठी जितके खाणे-पिणे आणि एक्सरसाईज गरजेची आहे तितकीच गरज आहे झोपेची. झोप पूर्ण झाल्याने थकवा जाणवत नाही तसे5च आपण दिवसभर फ्रेश राहतो. जर रात्री नीट झोप झाली नाही तर दिवसभर त्याचा त्रास होतो. तुम्ही अनेकजण पाहिले असतील जे पडल्या पडल्या घोरण्यास सुरूवात करतात मात्र काहीजण बराच वेळा कुशी बदलत असतात. काही लोकांची झोपण्याची एक सवय असते ते त्याच पद्धतीने झोपतात. यामुळे त्याना झोप लागते. काहींना कुशीवर झोपण्याची सवय असते. तर काही जण पोटावर झोपणे पसंत करतात. तुम्हाला झोपण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? जाणून घेऊया
प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. अधिकतर लोक तीन पद्धतीने झोपणे पसंत करतात. कुशीवर झोपणे, पोटावर झोपणे आणि पाठीवर झोपणे.
कुशीवर झोपण्याची पद्धत चांगली मानली जाते. अनेकज या पोझिशनमध्ये झोपतात. मात्र एकाच कुशीवर झोपू नये. कूस बदलत राहावी. ज्यांना घोरण्याची सवय आहे त्यांनी कुशीवर झोपावे.
यासोबतच फेटल पोझिशनमध्ये झोपणे योग्य मानले जाते. याचा अर्थ भ्रूणसारखी पोझिशन. यात शरीर आणि पाय एका दिशेला असतात. यामुळे पाय आणि कंबर दोघांनाही आराम मिळते. चांगल्या झोपेसाठी अशा पोझिशनमध्ये झोपणे चांगले मानले जाते.