Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत बेसबॉल बॅटने हल्ला करत पत्नीला मारले, भावावर केला जीवघेणा हल्ला

मुंबईत बेसबॉल बॅटने हल्ला करत पत्नीला मारले, भावावर केला जीवघेणा हल्ला

मुंबई: मुंबईत(mumbai) प्रॉपर्टी वादातून आपल्या पत्नीची हत्या(killed)mu केली. सोबतच मोठा भाऊही जखमी झाला आहे. हे प्रकरण मालाडच्या परिसरात घडले आहे. येथे राहणाऱ्या ४० वर्षीय ट्रेसन दासने आपल्या ३५ वर्षीय पत्नी चित्रा दासवर बेसबॉलने हल्ला करत तिचा खून केला. सोबतच भाऊ दामिया दासही यात जखमी झाले आहेत. त्यानंतर तेथून फरार झाले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी ट्रेसन दासचा तपास घेत आहेत. पोलिसांच्या ५ टीम त्याला शोधत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला शनिवारी ठाण्यात पोहोचली. महिलेने सांगितले की जेव्हा ती मार्केटमधून काही सामान घेऊन घरी परतली तेव्हा पाहिले की त्याची वहिनी चित्रा आणि पती दामिया रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

तर तिचा दीर ट्रेसन दास तेथून फरार आहेत. महिलेने शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही जखमींना रुग्णालयात पोहोचवले. येथे डॉक्टरांनी चित्राला मृत घोषित केले तर तिच्या पतीवर उपचार सुरू होते. पोलिसांनी महिलेला सांगितले की प्रॉपर्टीवरून ट्रेसन दास यांच्या कुटुंबात वाद सुरू होता. खरंतर, ट्रेसनला घर विकायचे होते मात्र कुटुंबाचा त्याला विरोध होता.

सकाळी यावरून कुटुंबासोबत ट्रेसनचा वाद झाला होता. महिलेच्या माहितीनुसार त्यानंतर प्रकरण शांत झाले. त्यानंतर ती कामानिमित्त मार्केटमध्ये गेली होती. जेव्हा ती परतली तेव्हा तिने पाहिले की तिची जाऊबाई आणि पती रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. बाजूलाच बेसबॉल बॅट आणि कुंडीही पडली होती. त्यानेच दोघांवर हल्ला केला होता. तर दीरही घरातून फरार होता. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी ट्रेसनविरोधात प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -