Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीNew year celebration : नवीन वर्षाचे स्वागत नियमात राहून करा अन्यथा...

New year celebration : नवीन वर्षाचे स्वागत नियमात राहून करा अन्यथा…

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांचा इशारा

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने नियमात राहून करा, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेत आनंद उत्सव साजरा करा, मात्र जल्लोष करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार असाल तर यासाठी नाशिक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी.

परिमंडळ दोनच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून यामध्ये फिक्स पॉईंट, गुन्हे शोध पथकांची हद्दीत गस्त असणार आहे. वरिष्ठ अधिकारी सर्वच ब्लॅक स्पोट व रस्त्यांवर आनंद उत्सव साजरा करण्याच्या जोशात चूक करणार नाही याची विशेष काळजी घेण्यासाठी स्वतः हजर राहणार असून टवाळखोरांवर, मद्यपींवर, कर्नकर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांवर दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

या काळात अनेक अपघात होत असतात यासाठी देखील खबरदारीच्या उपायोजना म्हणून जागोजागी पोलीस अधिकारी व अंमलदार ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेस करणार असून यापुढे देखील अशा प्रकारच्या कारवाया पोलिसांमार्फत निरंतर चालू राहतील, याची विशेष काळजी घेऊन कुठलीही चूक न करता आनंदात नवीन वर्षाचे स्वागत करावं.

त्याचबरोबर उपायुक्त मोनिका राऊत यांनी शहरवासीयांना एक संदेश दिला आहे तुम्ही आनंदी राहावं आम्हालाही यात विशेष आनंद आहे परंतु इतरांना त्रास देऊन कायदा हातात घ्याल तर मात्र कुणाचीही गय केली जाणार नाही. यावेळी परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांसह विभाग चार चे सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब डुकळे, पोलीस नाईक कुराडे, महिला पोलीस आंमलदर संध्या कांबळे, पोलीस शिपाई झाडे, पोलीस शिपाई ढाकणे, पोलीस हवालदार शेख, ए.एस.आय स्वामी, सागर जाधव आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -