Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाज31st : यंदाचा थर्टी फर्स्ट होणार ग्रॅण्ड...

31st : यंदाचा थर्टी फर्स्ट होणार ग्रॅण्ड…

  • ऐकलंत का! : दीपक परब

माधुरी, नाना पाटेकर, मकरंद, साधना सरगम यांची हजेरी, सध्या सर्वत्र सरत्या वर्षाला कशाप्रकारे निरोप द्यायचा हे ठरविण्यासाठी सर्वांच्या योजना तयार होत आहेत. पण जर कोणी घरी बसूनच आनंदाचा आस्वाद घेणार असतील तर त्यांच्यासाठी कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ हे पर्व आवर्जून पाहावे. प्रेक्षकांनी ‘सूर नवा ध्यास नवा’ला आतापर्यंत खूप प्रेम दिले आहे. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यापैकी सर्वोत्तम ६ स्पर्धक हे पर्वाच्या शेवटापर्यंत येऊन पोहोचले आहेत. तोच हा आवाज तरुणाईचा या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले आता जवळ आला आहे. म्हणजेच सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आता मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’चा ग्रॅण्ड फिनाले दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अद्वितीय उत्सव, या पर्वाच्या सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स, भव्य नृत्य प्रदर्शन आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकारांसोबत साजरा होणार आहे. हा अतुलनीय उत्सव केवळ मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा नसून बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्गज कलाकार नाना पाटेकर, विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आणि आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखीनच बहारदार होणार आहे. मनोरंजनाच्या जादूने भरलेल्या या सोहळ्यात मग्न होण्यासाठी आता सज्ज व्हा. थर्टी फर्स्टचा प्लॅन दिमाखात साजरा करण्यासाठी नक्की पाहा, ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ ग्रॅण्ड फिनाले, रविवारी ३१ डिसेंबर रोजी संध्या. ७वा. कलर्स मराठीवर.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -