Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडी

Ranvir Shorey : प्रभू रामाने मला माफ करुन सद्बुद्धी द्यावी

Ranvir Shorey : प्रभू रामाने मला माफ करुन सद्बुद्धी द्यावी

राम मंदिराला विरोध केलेल्या बॉलिवूड अभिनेत्याने मागितली जाहीर माफी


मुंबई : देशभरात सर्वत्र राम मंदिराच्या उद्धाटनाची (Ram Mandir inauguration)उत्सुकता आहे. एखाद्या सणाप्रमाणे संपूर्ण भारतभरात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र, काही विरोधक या गोष्टीचं राजकारण करत आहेत. बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) रणवीर शौकीने (Ranvir Shorey) देखील राम मंदिराला विरोध करत शाळा अथवा हॉस्पिटलची मागणी केली होती. मात्र, आपली चूक लक्षात आल्याचे सांगत त्याने सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. प्रभू रामाने मला माफ करुन सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना त्याने केली आहे.

रणवीरने एक ट्विट (Tweet) शेअर करत याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे, "अयोध्या राम मंदिराच्या जागी स्मारक किंवा हॉस्पिटल बनवू इच्छिणाऱ्या काही हिंदूंपैकी मीदेखील एक होतो, जेणेकरुन आपल्या समाजात अनेक काळापासून असलेले संघर्ष संपतील. पण, आज यासाठी मला स्वत:ची लाज वाटत आहे. शांतीसाठी मी धर्म आणि धार्मिकतेचं बलिदान द्यायला निघालो होतो. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या मूल्यांवर मी ठाम राहिलो नाही याबाबत मला लाज वाटत आहे," असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.



पुढे रणवीर म्हणतो, "सत्य आणि न्यायासाठी ही कठीण लढाई लढणाऱ्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मी भगवान राम यांच्याकडे माफी मागतो आणि मला सुद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो. आपल्या या भूमीवर धर्म कायम रहावा आणि सगळ्या भारतीयांच्या जीवनात शांती, समृद्धी यावी यासाठी मी प्रार्थना करतो. जय श्री राम." रणवीरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. कंगनाने रणवीरचं हे ट्वीट लाइक केलं आहे. तर अनुपम खेर यांनी 'जय श्री राम' असं लिहिलं आहे.
Comments
Add Comment