अयोध्या: अयोध्यामध्ये तयार झालेल्या राम मंदिरात(ram mandir) दर्शनासाठी २२ जानेवारीनंतर लोकांना येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) केले आहे. शनिवारी ते अयोध्येत होते. २२ जानेवारीला मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. यावेळेस संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने भक्तगण येण्याची शक्यता आहे.
हे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एक काळ असा होता जेव्हा अयोध्येत रामलल्ला तंबूत विराजमान होते. आज केवळ भगवान रामालाच पक्के घर मिळत नाही आहे तर देशातील ४ कोटी गरीब लोकांनाही मिळाले आहे. आजचा भारत आपल्या तीर्थक्षेत्रांनी नटलेला आहे तसेच डिजीटल टेक्नॉलॉजीनेही परिपूर्ण आहे.
मंदिर उद्घाटनाला दिवे लावण्याचे आवाहन
पंतप्रधान मोदी म्हणाले, विकास आणि वारशाची परंपरा भारताला २१व्या शतकात पुढे घेऊन जाणार आहे. २२ जानेवारीचा ऐतिहासिक क्षण खूप भाग्याने आपल्या जीवनात येणार आहे. प्रभू श्रीरामांच्या नगरीतून १४० कोटी देशवासियांना हात जोडून प्रार्थना आहे की २२ जानेवारीला अयोध्येत येण्यासाठी प्रयत्न करू नका याऐवजी अयोध्येत प्रभू श्री राम विराजमान होत आहेत. सर्व जण दिवाळी साजरी करा आणि आपापल्या घरात श्रीरामज्योती पेटवा. २२ जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण भारत देश दिव्यांनी उजळून निघायला हवा. जर आपण साडेपाचशे वर्ष वाट पाहिली आहे तर काही दिवस आणखी वाट पाहू. सुरक्षा आणि व्यवस्थेच्या दृष्टीने अयोध्येत येण्याची घाई करू नका कारण येथे श्रीरामाचे मंदिर अनंतकाळ राहणार आहे.
अयोध्या धामच्या विकासात कोणतीच कसर सोडणार नाही
पंतप्रधान मोदींनी अयोध्यावासियांना विश्वास दिला की या पवित्रा धामाच्या विकासात कोणतीच कसर मागे सोडणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की आज संपूर्ण जग उत्सुकतेने २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशातच अयोध्या वासियांमध्ये उत्साह असणे स्वाभाविकच आहे. पंतप्रधान म्हणाले ते भारताच्या मातीच्या कणाकणाचे आणि भारताच्या जन-जनचे पुजारी आहेत. तसेच मी अयोध्यावासियांना आग्रह केला की तुम्हाला देश आणि जगातील अगणित पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तयार राहावे लागेल. सर्व तीर्थस्थळे आणि सर्व छोट्या-मोठ्या मंदिरांना आग्रह केला आहे की १४ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता अभियान चालू ठेवा.
एकीकडे चंद्र आणि सूर्याचे अंतर मोजत आहोत
पंतप्रधान म्हणाले की आपण एकीकडे चंद्र आणि सूर्याचे अंतर मोजत आहोत तर आपल्या पौराणिक मूर्ती भारतात परत आणत आहोत. पंतप्रधान म्हणाले, आज अयोध्येत विकासाची भव्यता दिसत आहे काही दिवसांनी वंशाची भव्यता आणि दिव्यता पाहायला मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील जनसभेच्या ठिकाणी लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान मोदी एक दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर पोहोचले होते. येथे त्यांनी १५,७०० कोटी रूपयांच्या ४६ योजनांचे लोकार्पण आणि शिलान्यास केले. पंतप्रधान मोदींनी यावेळेस अयोध्या धाम जंक्शन आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासोबतच ६ वंदे भारत आणि २ अमृत भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला.