Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

पिझ्झा-बर्गर नाही तर Swiggy वर सलग ८व्या वर्षी बिर्याणीचेच राज्य, प्रत्येक सेकंदाला इतक्या ऑर्डर

पिझ्झा-बर्गर नाही तर Swiggy वर सलग ८व्या वर्षी बिर्याणीचेच राज्य, प्रत्येक सेकंदाला इतक्या ऑर्डर

मुंबई: देशात आता ऑनलाईन खाणे ऑर्डर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दर वर्षाप्रमाणेच फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने आपली ऑर्डर लिस्ट शेअर केली आहे. यानुसार स्विगी युजर्सने २०२३मध्ये सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली. खास बाब म्हणजे स्विगीवर बिर्याणी सलग आठव्या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केली जाणारी डिश ठरली.


भारतात २०२३मध्ये प्रति सेकंद २.५ बिर्याणी ऑर्डर केली गेली. २०२०मध्ये स्विगीवर ९० बिर्याणी प्रति मिनिट ऑर्डर करण्यात आली आहे. २०२१मध्ये हा आकडा वाढून ११५ बिर्याणी प्रति मिनिट इतका झाला. २०२२मध्ये रेकॉर्डतोड १३७ बिर्याणी प्रति मिनिट आणि २०२३मध्ये १५०हून अधिक बिर्याणी प्रति मिनिट ऑर्डर देण्यात आली.



२०२३मध्ये सगळ्यात आवडते खाद्य


भारतीयांना बिर्याणी प्रचंड आवडते. स्विगीवर लोकांना व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी मोठ्या प्रमाणात ऑर्डर केली. चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी ऑर्डर कऱण्यात आली. २.४ मिलियन नव्या युजर्सनी स्विगीवरून आपली फर्स्ट ऑर्डर म्हणून बिर्याणी ऑर्डर केली.



वन लाईट मेंबरशिपमध्ये ३ महिन्यांपर्यंत फ्री डिलीव्हरी


नुकतेच स्विगी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ३ महिन्यांसाठी ९९ रूपयांच्या किंमतीवर वन लाईट मेंबरशिप सुरूवात केली आहे. वन लाईट मेंबरशिपसोबत युजर्सला १४९ रूपयांपेक्षा अधिकच्या फूड ऑर्डरवर १० फ्री डिलीव्हरी मिळणार. सोबतच १९९ रूपयांहून अधिक इन्स्टाग्राम ऑर्डरवर १० फ्री डिलीव्हरी मिळणार. फ्री डिलीव्हरीशिवाय मेबर्सला २० हजाराहून अधिक रेस्टॉरंटमध्ये रेग्युलर ऑफरसोबत ३० टक्के अधिक अतिरिक्त सूट मिळणार. कंपनीने सांगितले की वन लाईट मेबर्सला ६० रूपयांहून अधिक स्विगी जिनी डिलीव्हरीवर १० टक्क्यांची सूट मिळेल.

Comments
Add Comment