Thursday, June 19, 2025

काव्यरंग

काव्यरंग

नव वर्षाची पहाट


आली नव वर्षाची पहाट आली...
सुख स्वप्नांची उधळण झाली
गत वर्षाच्या आठवणींची
कशी हृदयात दाटी झाली
आली नव वर्षाची पहाट आली...१

भले बुरे ते विसरून पाठी
स्मित लाघवी ठेवून ओठी
नव्या नात्यांची जोडण झाली
आली नव वर्षाची पहाट आली...२

कमी न व्हावी सूखे साजिरी
लक्ष्मी नांदो सदैव सदनी
अमृत सरिता लाभो वदनी
आली नव वर्षाची पहाट आली...३

मन हे डोले तलावराती
पाय थिरकाती घेऊन गिरकी
मनमोर हा नाचे हर्षूनी
आली नव वर्षाची पहाट आली...४
- राजश्री नीरज बोहरा, डोंबिवली - ठाणे

करूया २०२४ चे स्वागत !!


गेले जुनं वर्ष, झाले आरोप- प्रत्यारोपाने
आता करू स्वागत, नवं चैतन्याने !! धृ !!
गत वर्षी मिळे वेदना
भरे हृदयी छेद ना
महागाईत भेद ना
म्हणून शिकूया जखमा सोबत !! १ !!
जाहिरातींचा मेळ
होई जीवाचा खेळ
जाई पैसा नि वेळ
म्हणून जगुया निरिक्षणासोबत !! २ !!
काहींवर अत्याचार
काहींचा अहंकार
काहींना सत्कार
म्हणून जीवनाचे वाचू पुस्तका सोबत !! ३!!
नात्यांना जपुया
मित्रांना हसवूया
मोबाइलला बाजूला ठेवूया
म्हणून माणुसकीला घेऊया सोबत !! ४ !!
बनावे मानवधर्माचे भक्त
समानताने राहावे फक्त
ज्ञान वाढवावे हे सक्त
म्हणून घ्यावे दिशाहिनांना सोबत !! ५ !!
कमी खावे घरचे गरम
राहावे डोक्याने सदा नरम
विसरावे जुने वरम
म्हणून नांदावे व्यायामा सोबत !! ६ !!
ठेवूया सदा हर्ष मुख
मनाने देऊ सुख
गरजवंतांची भागवू भुख
म्हणून फिरूया सामाजिक बांधिलकी सोबत !! ७ !!
आपणांस २०२४ वर्षाची शुभेच्छा
आपणांस “आरोग्य धनसंपदा” लाभो, हीच सदिच्छा.
आपले “संकल्प” पूर्ण होवो‌त, हीच इच्छा
म्हणून राहू “सहकार्याने” आनंदा सोबत !! ८ !!
आता करूया “२०२४चं स्वागत” नवं चैतन्याने !
~शब्दश्री विलास देवळेकर
Comments
Add Comment