
मुंबई: दिल्लीवरून मुंबईला जैणाऱ्या महिला प्रवाशाला इंडिगो एअरलाईन्सच्या(indigo airlines) विमानात दिलेल्या सँडविचमध्ये किडे आढळले. महिलेने या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर इंडिगो एअरलाईनने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे सोबतच महिला प्रवाशाकडून माफी मागितली आहे.
सँडविचमध्ये आढळले किडे
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला खुशबू गुप्ता दिल्ली येथून मुंबईला जाणाऱ्या फ्लाईट क्रमांक 6E 6107 मधून प्रवास करत होती. तिने सँडविच मागवले यात तिला किडे आढळले. यानंतर तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवत शेअर केला. यावर अनेक कमेंट आल्या आहेत.
View this post on Instagram
इंडिगोने मागितली माफी
इंडिओ एअरलाईनच्या एका प्रवक्त्याने सांगितले की आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. हे प्रवासी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानात प्रवास करत होते. आमच्या फ्लाईट क्रूने तपासणीनंतर सँडविच वाटणे बंद केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. आम्ही केटरिंग सुविधा देणाऱ्या कंपनीला याबाबतीतील सूचना दिली आहे. भविष्यात आम्ही आणखी चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच प्रवाशांना होणाऱ्या असुविधेसाठी माफी मांगतो.