Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीRation Shopkeepers Strike : सामान्यांच्या नववर्षाची सुरुवात संकटाने; १ जानेवारीपासून रेशन दुकानदारांचा...

Ration Shopkeepers Strike : सामान्यांच्या नववर्षाची सुरुवात संकटाने; १ जानेवारीपासून रेशन दुकानदारांचा संप

काय आहेत मागण्या?

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षात (New year) प्रवेश करताना येणारं वर्ष आनंदाचं, समृद्धीचं असेल अशा भावना आपण व्यक्त करतो. मात्र, सामान्य माणसाच्या (Common man) नशिबात लिहिलेल्या समस्या काही जायचं नाव घेत नाहीत. यंदाच्या नववर्षाची सुरुवातच सामान्यांसाठी एका वाईट बातमीने होणार आहे. राज्यभरातील सर्व रेशन दुकानदार त्यांच्या मागण्यांसाठी १ जानेवारीपासून बेमुदत संप (Ration Shopkeepers Strike) पुकारणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहे. तर १ जानेवारीपासून पुण्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर असणार आहेत.

काय आहेत मागण्या?

  • रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा.
  • टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या.
  • मार्जिन मनी ३०० रुपये करा.
  • कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी करा.
  • तसेच चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा.

राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेशनचं दुकान बंद असणार आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांचे हाल होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -