Tuesday, July 16, 2024
HomeदेशTerrorist organization : जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी

Terrorist organization : जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली माहिती

जम्मू काश्मीर : केंद्र सरकारने (Central Government) काही दिवसांपूर्वी काश्मीर (Kashmir) खोऱ्यातील मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (Muslim league Jammu kahsmir) या संघटनेला दहशतवादी संघटना (Terrorist organization) म्हणून जाहीर करत त्यावर बंदी घातली होती. त्यानंतर सरकारने आणखी एका संघटनेवर ही कारवाई केली आहे. काश्मीमधील फुटीरतावादी पक्ष ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ला (Tehreek-E-Hurriyat) दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारकडून काश्मिरी फुटीरतावादी संघटनांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. त्यातूनच या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. तेहरीक-ए-हुर्रियत (TeH) ला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे. दहशतवादाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या झीरो टॉलरंस पॉलिसीअंतर्गत भारत विरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असंही अमित शहा म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे आणि जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करणे हा त्याचा उद्देश आहे. ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ही काश्मीरमध्ये फुटीरतावादाला प्रोत्साहन देत होती. या संघटनेकडून इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू होता. भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांचा तात्काळ उच्चाटन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

याआधीही एका संघटनेवर कारवाई

मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) या संघटनेवर २७ डिसेंबर रोजी सरकारने बंदी घातली होती. या संघटनेचा नेता मसरत आलम भट हा भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतला असल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या समर्थनात त्याने काश्मिरी खोऱ्यात कारवायादेखील केल्या आहेत. त्याशिवाय, दहशतवादी गटांना या संघटनेकडून पाठिंबा दिला जात होता.

काय आहे UAPA कायदा?

अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हीटीज प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट (UAPA) अंतर्गत केंद्र सरकार कोणत्याही संघटनेवर बेकायदा किंवा दहशतवादी घोषित करू शकते. देशात गृह मंत्रालयाकडून सध्या ४३ संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले असून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अनेक खलिस्तानी संघटना, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद, लिट्टे आणि अलकायदा अशा संघटनांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -