Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडी'सूर लागू दे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला...

‘सूर लागू दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ‘सूर लागू दे’च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विन पांचाळ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘सूर लागू दे’चा ट्रेलर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारा आहे. चित्रपटात काय पाहायला मिळेल याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांची केमिस्ट्री, अभिनयातील परीपक्वपणा आणि देवाणघेवाण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटातील गाणीही सुरेख असून, अर्थपूर्ण संवाद उत्सुकता वाढवणारे आहेत. यातील कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी असून, यातील श्रवणीय गीत-संगीत मन मोहून टाकणारं आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.

‘सूर लागू दे’ हा चित्रपट समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब दाखवणारा आहे. विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, रीना मधुकर, मेघना नायडू यांच्यासह आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा ज्ञाते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -