मुंबई (प्रतिनिधी): आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे रविवारी ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. रजनीश शेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख कोण होणार? हे नवीन वर्षात ठरणार आहे.
राज्याच्या पोलीस महासंचलाकपदासाठी कोणाची नियुक्ती करावी? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत रश्मी शुक्लांना महासंचालक बनवण्याचे ठरले. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र संवर्गीय अधिकारी सशास्त्री सीमा दलाचे महासंचालक म्हणून काम केले आहे.
तसेच, सेंट्रल रिझर्व पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पोस्ट करण्यापूर्वी शुक्ला यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर विंगच्या संचालक म्हणून काम करण्यासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.