Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीAkshay Kumar : मला वाटलं होतं मी सुंदर मुलीशी लग्न केलंय, पण...

Akshay Kumar : मला वाटलं होतं मी सुंदर मुलीशी लग्न केलंय, पण…

ट्विंकल खन्नाच्या वाढदिवशी अक्षय कुमारने ही काय पोस्ट केली?

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी (Bollywood Khiladi) अक्षय कुमार (Akshay Kumar) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतो. आपली पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) व मुलांसोबतचे फोटोज तो कायम सोशल मीडियावर शेअर करतो. ट्विंकल खन्नाशी २००१ मध्ये त्याने लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधलं हे चाहत्यांच्या आवडीचं एक कपल आहे. पण ट्विंकल खन्नाच्या वाढदिवशी (Twinkle Birthday) अक्षय कुमारने केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. आज ट्विंकलचा वाढदिवस असून अक्षय तिच्याबद्दल जे म्हणाला, ते पाहून चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

अक्षयने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ट्विंकलचा सुंदर सफेद रंगाचा वनपीस परिधान केलेला फोटो दिसतो आणि लिहिलेले दिसते की, ‘मला वाटलं होतं मी या मुलीशी लग्न केलंय’ (Who I thought i marrried). त्यानंतर ‘पण खरंतर मी कोणाशी लग्न केलंय’ (Who I Actually married) असं लिहिलेली एक स्क्रीन दिसते आणि ट्विंकल हॉलिवूड कॅरेक्टर हल्कच्या पुतळ्यासमोर उभी असलेली दिसते. ती स्वतःला उद्देशून म्हणते, ‘ये है पुतला और यह है असली हल्क’ आणि हल्कसारखी ओरडते. ट्विंकलचा हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत अक्षयने खास अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिलं आहे, ‘दीर्घायुषी हो माझी हल्क. तुझ्या विनोदबुद्धीने आपलं आयुष्य वाढवल्याबद्दल तुझे खूप आभार. देव तुला आणखी आयुष्य देवो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा टिना’, असं म्हणत अक्षयने आपल्या पत्नीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. चाहत्यांनी कमेंट्स करत ट्विंकलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी दोघांची जोडी कायम अशीच राहू देत, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -