Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Sunil Kedar : आजाराची नौटंकी करणार्‍या सुनील केदारांना डॉक्टरांनी पाठवले तुरूंगात

Sunil Kedar : आजाराची नौटंकी करणार्‍या सुनील केदारांना डॉक्टरांनी पाठवले तुरूंगात

शिक्षेपासून वाचण्यासाठी करत होते प्रयत्न?


नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात (Nagpur bank scam) काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा आणि साडेबारा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. शिक्षा सुनावल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कारागृहात जाण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी करत असताना त्यांनी तब्येतीची तक्रार केली. मात्र, त्यांचे सर्व रिपोर्टस नॉर्मल आले असून डॉक्टरांनीच त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली आहे.


सुनील केदार दाखल असलेल्या नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील चार तज्ज्ञ डॉक्टरांनी काल रात्री त्यांची प्रकृती बरी असल्याचा अहवाल सादर केला. त्यांना मायग्रेनचा त्रास, न्यूमोनियाचे लक्षण आढळून आले होते. ताप वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. याशिवाय किडनीचाही संसर्ग झाल्याने उपचाराचा कालावधी वाढला. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती स्थिरावताच, ते ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला. हा अहवाल येताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, त्यांची तडकाफडकी कारागृहात रवानगी केली. गेल्या २२ डिसेंबरपासून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


रुग्णालयातील पथकाने सुनील केदार यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्यासाठी केवळ अर्ध्या तासापूर्वी डिस्चार्ज करण्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना काही वेळ तयारीसाठी देण्यात आला व त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. आता त्यांना कारागृहातील ‘आफ्टर बॅरेक’मध्ये इतर कैद्यांसोबत ठेवण्यात येणार आहे.


सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवण्यात आला. अखेर नार्वेकरांनी त्यांची आमदारकी रद्द केली. हाती काहीच न उरल्यामुळे कुठून तरी वाचता येतंय का, याचा प्रयत्न ते करत होते. अखेर डॉक्टरांनी ते व्यवस्थित आणि फिट असल्याचं सांगत त्यांना तुरुंगात पाठवलं.


Comments
Add Comment