Saturday, July 13, 2024
Homeक्रीडाIndia Vs South Africa Test series : लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर आयसीसीची...

India Vs South Africa Test series : लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर आयसीसीची मोठी कारवाई; थेट सहाव्या स्थानावर गेला भारताचा संघ!

काय आहे कारण?

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना (India Vs South Africa Test series) काल पार पडला. यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणारा भारत थेट पाचव्या स्थानावर घसरला. हा भारतासाठी पहिला मोठा धक्का होता. पण यानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे भारताची रवानगी गुणतालिकेत पाचव्या स्थानावरुनही खाली सहाव्या स्थानावर झाली आहे. तर सहाव्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ यामुळे पाचव्या स्थानावर आला आहे.

भारतासमोरच्या अडचणीचे कारण म्हणजे आयसीसीने (ICC) भारताचे २ महत्त्वाचे गुण कमी केले आहेत. याशिवाय आयसीसीने सर्व भारतीय खेळाडूंना मॅच फीच्या १० टक्के दंडही ठोठावला आहे. यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. त्यामुळे गुणतालिकेत भारताला मोठा फटका बसला आहे.

काय आहे कारवाईचे नेमके कारण?

आयसीसीने टीम इंडियाला आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत दंड ठोठावला आहे. हे कलम किमान ओव्हर-रेटशी संबंधित आहे. कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकली तर खेळाडूंना मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो. भारताने २ षटके उशिराने टाकली, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड आणि २ गुण कापण्यात आले.

सेंच्युरियन कसोटी सामना गमावल्यानंतर भारताचे १६ गुण होते आणि गुणांची टक्केवारी ४४.४४ होती. परंतु ICC ने २ गुणांचा दंड ठोठावला, त्यानंतर भारताचे १४ गुण आणि गुणांची टक्केवारी ३८.८९ वर आली आहे. आयसीसीच्या या कारवाईनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षाही खाली गेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -