Thursday, October 30, 2025
Happy Diwali

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाहा काय म्हणाला रोहित शर्मा...

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाहा काय म्हणाला रोहित शर्मा...

सेंच्युरियन: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत एक डाव आणि ३२ धावांनी पराभव सहन करावा लागला. या पराभवासोबत भारताचे आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले. भारतीय संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकला तरी मालिकेत बरोबरी साधली जाईल. कसोटी मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.

संपूर्ण संघाचे सामूहिक प्रयत्न गरजेचे - रोहित

पहिल्या कसोटीतील टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचे विधान समोर आले आहे. रोहितने दोन्ही डावांतील खराब फलंदाजी हे पराभवाचे प्रमुख कारण सांगितले आहे. सोबतच रोहित गोलंदाजांच्या कामगिरीने खुश नाही. रोहितने सांगितले की विजयासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे पहिल्या सामन्यात झाले नाही. दरम्यान, रोहितने यावेळी शतक ठोकणाऱ्या केएल राहुलचे कौतुक केले.

रोहित शर्माने सामना संपल्यावर सांगितले, आम्ही विजयासाठी योग्य नव्हतो. पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर केएलने चांगली बॅटिंग करत आम्हाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली मात्र आम्ही गोलंदाजीने परिस्थितीचा फायदा उचलू शकलो नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात आम्ही फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलो नाही. जर आम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर सामूहिकरित्या एकत्र यावे लागेल आणि आम्ही असे केले नाही.

रोहित पुढे म्हणाला, काही खेळाडू आधीही येथे आले आहेत. आम्हाला माहीत आहे की काय अपेक्षा केली पाहिजे आणि प्रत्येकाची आपली योजना असते. आमच्या फलंदाजांना आव्हानात्मक स्थिती मिळाली आणि ते त्यात खरे उतरू शकले नाहीत. हा एक मोठा बाऊंड्री स्कोरिंग मैदान आहे. आम्ही त्यांना मोठा स्कोर करताना पाहिले आहे. मात्र आम्ही प्रतिस्पर्धी आणि त्यांची ताकद समजून घेणे गरजेचे असते. आम्ही दोन्ही डावांत चांगली फलंदाजी करू शकलो नाही.

Comments
Add Comment