मुंबई: थंडीचा मोसम(winter) सुरू आहे. अनेकजण थंडीचा जोर वाढला की ब्लँकेट अथवा रजई घेऊन झोपतात. काही जण तर रजई अथवा ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का अशी सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. रजई अथवा ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपल्याने आपला श्वास गुदमरू शकतो. तसेच रक्तसंचारावरही परिणाम होऊ शकतो. कारण चादर तोंडावर घेतल्यास शरीराला फ्रेश ऑक्सिजन मिळत नाही आणि खराब ऑक्सिजन शरीराच्या आतच राहतो.
तोंडावर चादर घेऊन का झोपू नये?
फुफ्फुसांना होऊ शकतो त्रास
तोंडावर चादर घेऊन झोपल्याने शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच श्वास कोंडणे अथवा हार्ट अॅटॅकसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. अनेक बाबतीत तर फुफ्फुसांचे आकुंचन होते. यामुळे थंडीच्या दिवसांत तोंडावर चादर ओढू नये.
त्वचेच्या समस्या वाढतात
आरोग्य तज्ञांच्या मते थंडीच्या दिवसांत तोंडावर चादर घेऊन झोपल्या त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. रजई अथवा ब्लँकेटमधील खराब हवा त्वचेचा रंग काळवंडू शकते. यासाठी त्वचेवर रॅशेसची समस्या येऊ शकते. त्यामुळे लगेचच आपली ही सवय बदला.
कोणाला आहे सर्वाधिक धोका?
आरोग्य तज्ञांच्या मते ज्या लोकांना अस्थमा, सीओपीडी अथवा श्वासासंबंधी काही दुसरे आजार असतील तर त्यांनी चुकूनही तोंडावर चादर घेऊन झोपू नये. अशा लोकांसाठी ही सवय जीवघेणी ठरू शकते. तोंडावर चादर घेऊन झोपल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात. यामुळे अस्थमाचा अॅटॅक येण्याचीही भीती असते.