Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

खुशखबर! सुकन्या समृ्द्धी योजनेवर सरकारने वाढवले व्याज, FDवरही अधिक फायदा

खुशखबर! सुकन्या समृ्द्धी योजनेवर सरकारने वाढवले व्याज, FDवरही अधिक फायदा

नवी दिल्ली: सरकारने छोट्या बचत योजनांमध्येे(small savings scheme) पैसे गुंतवणाऱ्या लोकांसाठी नव्या वर्षाआधी मोठे गिफ्ट मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत सुकन्या समृद्धी योजनांवरील(sukanya sammruddhi scheme) या व्याजदरात वाढ केली आहे. तब्बल दीड वर्षांनी या योजनांमधील व्याजदरात बदल केला आहे. यावेळेस २० आधार अंक म्हणजेच ०.२० टक्के व्याजदरात वाढ केली आहे.


अर्थ मंत्रालयाने बैठकीनंतर सांगितले की जानेवारी-मार्च २०२४च्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांची वाढ केली आहे. २९ डिसेंबरला मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले की ३ वर्षाच्या टाईम डिपॉझिट म्हणजेच पोस्ट ऑफिस एफडीवर व्याज दरातील १० आधार अंकाची वाढ केली आहे. आता या योजनेवरील व्याजदरात ७ टक्क्यांच्या ऐवजी ७.१० टक्के व्याज मिळणार नवे व्याज दर चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत लागू केले जातील.



सुकन्यावरील किती व्याजदर वाढले


नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आले की सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी ८ टक्क्यांऐवजी आता ८.२ टक्के व्याज मिळणार आहे. या योजनेवर २० आधार अंकामध्ये वाढ करण्यात आली आहे. खास बाब म्हणजे सुकन्यावर सरकारने तब्बल ६ तिमाहीनंतर वाढ केली आहे.



अन्य योजनांवर काय परिणाम


केंद्र सरकारने अन्य छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. पीपीएफ, एनएससीसारख्या योजनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या सर्व योजनांवर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या समान व्याज मिळेल. दरम्यान, या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नव्या वर्षातही जुने व्याजदर मिळतील.

Comments
Add Comment