मुंबई: आजकालच्या लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक जण लठ्ठपणाने(obesity) त्रस्त आहेत. वाढत्या वजनामुळे त्यांच्या रोजची कामे करण्यात अडचण येते तसेच आरोग्यावरही(health) दुष्परिणाम होतात. अशातच बरेचजण वजन कमी(weight loss) करण्यासाठी डाएटिंग आणि एक्सरसाईजचा पर्याय निवडतात. तसेच अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारची ड्रिंक पितात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहील.
यातील सामान्यपणे केला जाणारा उपाय म्हणजे दुधाची चहा बंद करून ब्लॅक टी अथवा ग्रीन टी पिण्यास सुरूवात करतात. दरम्यान, अनेक लोकांमध्ये असा संभ्रम असतो की वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टी प्यावी की ग्रीन टी प्यावी. अशातच हे जाणून घेणे गरजेचे असते की ब्लॅक टी की ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर असते जाणून घ्या…
तज्ञांच्या माहितीनुसार
ग्रीन टीमध्ये कॅटेकिन्स नावाचे कंपाऊंड असते जे मेटाबॉलिज्म वाढवून वजन घटवण्यास फायदेशीर ठरते. तर ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे फॅट कमी करण्यासाठी मदत करतात. ब्लॅक टीही फ्लॅव्हेनाईड्स आणि पॉलिफेनॉल्स सारखे अँटी ऑक्सि़डंट मोठ्या प्रमाणात असतात जे वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्हीचे सेवन केल्याने लाभ मिळतो. मात्र वजन घटवण्याच्या बाबतीत ग्रीन टी अधिक फायदेशीर मानली जाते.
ग्रीन टी की ब्लॅक टी?
ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्हींपैकी ग्रीन टी वजन घटवण्यात अधिक फायदेशीर मानली जाते. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट ईजीसीजी असते जे चरबी घटवण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये कॅटेकिन नावाचे कंपाऊंड भरपूर असते जे आपल्या चयापचयाचा दर वाढवतात आणि अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. ग्रीन टी प्यायल्याने आपले पोट भरलेले राहते आणि यामुळे अधिक खाल्ले जात नाही. याउलट ब्लॅक टीमध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि फॅट बर्निंग कंपाऊंड नसतात. यामुळे वजन घटवण्याच्या दृष्टीने ग्रीन टी ब्लॅक टीपेक्षा अधिक फायदेशीर आहे.